How to find a job? नोकरी कशी शोधायची ?

 

नोकरी कशी शोधायची ?

नमस्कार मित्रांनो कोरोना च्या प्रदूरभावामुळे अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्यात अशा अनेक तरुणांनी आम्हाला विचारलं नोकरी कशी शोधयाची  online  Platform म्हणजेच Naukri.com,  Indeed , Linkdin इ .  आम्ही खालील step  दिलेल्या  आहे.

आम्ही तुम्हाला private  व  Government  जॉब चे रोज update  देत असतो तुम्ही  आमच्या Telegram Channel Join  करा व तुमच्या मित्राना  share  करा खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून लवकर च जॉईन करा .

how to find job ?

how to find Job?

Whats App Link :- Click to here

Join Us On Telegram :- येथे क्लिक करा

एखादा फ्रेशर किंवा नुकताच नोकरी सोडलेला किंवा बेरोजगार आहे, त्याची नोकरी शोधण्याची प्रक्रिया आणि पद्धत कशी असावी ?  पर्याय १ नोकरी डॉट कॉम, इनडीड सारख्या संकेतस्थळावर दररोज सकाळी ८-१० ह्या वेळेत आपली प्रोफाईल अपडेट करावी आता प्रोफाईल अपडेट करायची म्हणजे काल जो आपण

आपला अद्यतन ( बायोडटा/रिझ्युम) तो डिलीट करून तोच अद्यतन ( बायोडटा/रिझ्युम) दुसऱ्या दिवशी सांगितलेल्या वेळेत अपलोड करावा हे काम दररोज करायचे आहे. प्रोफाईल ची हेडलाईन हि उत्तम असवी जेणेकरून एच आर लोकांना जे नेमकं हव आहे ते शोधायला सोप जाईल, त्यानंतर लिंक्डइन ह्या

संकेतस्थळावर स्वतःची प्रोफाईल तयार करावी लिंक्डइन वर वेगवेगळ्या कंपनीतील कंपन्यांचे मालक, वेगवेगळ्या कंपनीतील एच आर , वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांसोबत संपर्क करावे जास्तीत जास्त कनेक्शन तयार करावी. कंपन्यांच्या खात्यांना फोल्लो करावे . लिंक्डइनवर पण नोकरी शोधता येते

लिंक्डइनवर नोकरी विषयक आपल्याला ज्या क्षेत्रात नोकरी हवी आहे त्याचे अलर्ट चालू करता येतात . वरील सर्व काम हे जास्तीत जास्त १ तासाचे आहे हे जरी तुम्ही नियमित केले तरी नोकरी मिळण्याच्या संधी वाढतील आता एवढ करून देखील मुलाखतीचे फोन येत नसतील तर दुसरा पर्याय खालील प्रमाणे

पर्याय २ एक एक्सेल शीट बनवणे त्यात कंपनीचे नाव, इमेल पत्ता, संपर्क क्रमांक असे कॉलम तयार करणे तुम्ही ज्या क्षेत्रात नोकरी शोधत आहात त्या क्षेत्रातील कंपन्यांची नावे गुगल ह्या सर्च इंजिन द्वारे काढणे ( दररोज ५ कंपन्या ) आपण ज्या कंपन्यांची माहिती काढली

आहे ती त्या एक्सेल शीट मध्ये भरणे म्हणजे कंपनीचे नाव, इमेल पत्ता, संपर्क क्रमांक हे सर्व. कंपनीचे नाव, इमेल पत्ता, संपर्क क्रमांक हि माहिती तुम्हाला त्या कंपनीच्या संकेतस्थळावर आणि लिंक्डइनवर मिळून जाईल. आता जे इमेल पत्ते आपल्याला मिळाले आहेत त्यांचा वापर करून त्यांना मेल करणे

इमेल करताना त्यामध्ये विषय लिहिणे महत्वाचे आहे त्यानंतर खाली मजकुरात कव्हर लेटर लिहिणेसोबत त्या इमेल मध्ये तुमचा बायोडाटा जोडणे आणि पाठवणे असेच बाकीच्या ४ इमेल पत्त्यांसाठी पुन्हा हीच प्रक्रिया करणे. आता ह्यानंतर आपल्याकडे त्या कंपनीचा संपर्क क्रमांक आहे तिथे संपर्क करणे त्यांना

तुमच्या बद्दल माहिती देणे आणि विचारणे मी जी माहिती सांगितली आहे त्याच्यानुसरून तुमच्या कंपनीमध्ये काही ओपनिंग आहे का ? असेल तर तुमच्या एच आर चा इमेल पत्ता द्या आता पुन्हा ह्या इमेल पत्त्यावर कव्हर लेटर आणि बायोडटा पाठवणे . लिंक्डइनवर त्या कंपनीमध्ये काम करणारे लोकं शोधून.

Why are people rejected in HR rounds?

HR Round Questions and Answers for Freshers ?

त्यांच्या मार्फत पुन्हा एकदा त्याच कंपनीमध्ये अप्लाय करणे . मुख्य म्हणजे तुम्ही एकाच कंपनीमध्ये ३ वेळा अप्लाय करताय हे विसरू नका ह्याचा अर्थ तुम्ही दररोज ५ कंपन्या मध्ये वरील पद्धतीत अप्लाय केले तर ८ दिवसात तुम्ही ४० कंपन्यांमध्ये अप्लाय करताय आणि १ महिन्यात १५० कंपन्यांना

आणि ह्या ४० पैकी किंवा १५० पैकी कमीत कमी २-३ ठिकाणी तरी तुमची मुलाखत नियोजित होईल कि नाही ? साध सोप आणि सरळ गणित आहे हे ! वरील सर्व काम हे जास्तीत जास्त २ ते ३ तासाचे आहे हे जरी तुम्ही नियमित केले तरी नोकरी नक्की मिळणारच !

आपण अप्लाय करताना कुठे चुकतो १) कम्फर्ट झोन न सोडता नोकरी शोधणे २) तुमचा बायोडाटा नीट नसणार, त्यातील मांडणी चुकीच्या पद्धतीत असणार ३) अप्लाय करण्याची पद्धत किंवा इमेल पाठवण्याची पद्धत चुकीची ४) बायोडाटा मध्ये नेमकं जे हवं आहे ते नसणार म्हणजे मुद्देसुद माहिती हवी

दररोज नित्यक्रम — १) घरी शांत जागेवर, सार्वजनिक वाचनालयात किंवा वायफाय असलेल्या कोणत्याही ठिकाणी जाणे २) ९० मिनिटांत सीव्ही / रेझ्युमे सुधार, किंवा ऑनलाइन जॉब अनुप्रयोगांसाठी कीवर्ड टेलरिंग ३) दृश्यमानता वाढविण्यासाठी लिंक्डइन क्रियाकलापाचा एक तास.

रेझुमे/सिव्ही तयार करण्यासाठी खालील संकेतस्थळं वापरू शकता ?

४) एक तासाचे लंच ब्रेक / वैयक्तिक नेटवर्किंग मध्ये. ५) दोन तास नोकरी शोध ( नोकरी डॉट कॉम , लिंक्डइन जॉब्स, इनडीड) ६) एक तास कौशल्य सुधारणा लिंक्डइन लर्निंग, युडेमी, ईडीएक्स, अपस्कील कोर्सेस इत्यादी

७) एक तासा मुलाखतची तयारी-कार्यक्षमता-मुलाखत प्रश्नांना प्रतिसाद, हस्तांतरणीय कौशल्य ओळख आणि संदर्भ, कृती, निकाल, शिकणे. हे तंत्र वापरणे

सध्या नोकरीत असलेल्यांसाठी, संक्रमणाकडे लक्ष देताना: शोधासाठी आणि आठवड्याच्या शेवटी आठवड्यातून ३०-६० मिनिटे खर्च करा. आपल्या जागी एखादी रचना असेल तरच आपण या कठीण काळातून जाल अन्यथा औदासिन्य / सुस्तपणा

येऊ शकतो आपले डोळे शिखरावर असलेल्या प्रकाशावर स्थिर ठेवा कारण …. तिथेच आपले उज्ज्वल भविष्य आहे ! नोकरी शोधताना खूप म्हणजे खूप संयम ठेवावा लागतो आणि सगळ्यात म्हत्वाच म्हणजे कितीही कठीण परिस्थिती असली तरी शांत मनाने ती सोडवता येण खूप गरजेच

आहे कधीही निराश राहू नका आणि आलेली संधी घालवू नका. इतरांपेक्षा आपली अप्लाय करण्याची पद्धत कशी वेगळी ठेवता येईल याचा विचार करा नवनवीन कोर्सेस करा, आपलं कौशल्य वाढवा. 

How to Write a Resume To Land a Job Interview :- Click to here

HR Round Questions and Answers for Freshers :- Click to here

How to write a cover letter :- Click to here

Website Link :- Click to here

Whats App Link :- Click to here

Join Us On Telegram :- येथे क्लिक करा

Join Us On Instagram :-  येथे क्लिक करा

Join Us On Youtube Channel :- येथे क्लिक करा

Leave a comment